अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा! SEBC प्रवर्ग कुठे? – Maharashtra Anganwadi Bharti 2024

अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा! SEBC प्रवर्ग कुठे? – Maharashtra Anganwadi Bharti 2024

नमस्कार आज आपण अंगणवाड्यामध्ये 15000 पदांची भरती सुरू आहे महिलांना हाताला काम व उदारनिर्वाह आपण या योजनेचा लाभ घ्यावा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंर्तगत राज्यातील जिल्हा परिषदेंर्तगत ग्रामीण, आदिवासी, नागरी प्रकल्पातील कार्यरत एकूण १४ हजार ६९० अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली. अंगणवाडी मदतनीसांची पदे भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Maharashtra Anganwadi Bharti 2024

Maharashtra Anganwadi Bharti 2024

Maharashtra Anganwadi Bharti

2 फेब्रुवारी 2023च्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत 75 गुण शैक्षणिक पात्रतेवर तर 25 गुण जातीनिहाय आरक्षणावरून दिले जातात. मात्र, मराठा आरक्षणानंतरही त्या शासन निर्णयात बदल न झाल्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना भरतीत 5 गुण मिळत नसल्याचे समोर आले आहे.सध्या राज्यातील अंगणवाड्यांमधील १५ हजार मदतनिसांची पदे भरली जात आहेत. २ फेब्रुवारी २०२३च्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मदतनीस व सेविकांच्या पदभरतीत ७५ गुण शैक्षणिक पात्रतेवर तर २५ गुण जातीनिहाय आरक्षणावरून दिले जातात. मात्र, मराठा आरक्षणानंतरही त्या शासन निर्णयात बदल न झाल्याने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीत पाच गुण मिळत नसल्याचे समोर आले आहे.

अंगणवाडी मदतनीस पदांच्या भरतीसाठी संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण, आदिवासी, नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या मदतनीस पदासांठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण असलेल्या १८ ते ३५ वर्षे वयोगटातील व विधवा उमेदवारांच्या बाबतीत कमाल ४० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक महिला उमेदवारांनी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.


केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात एक लाखांवर अंगणवाड्या सुरू आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता मिनी अंगणवाड्या मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी मदतनीस व सेविकांची पदे भरली जाणार आहेत.

राज्यातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांमध्ये नव्याने पदभरती होणार आहे.
तत्पूर्वी, भरतीसाठी बारावी उत्तीर्णची अट घातल्याच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने सेविकांची भरती तुर्तास स्थगित आहे. त्यामुळे पूर्वीच्या ज्या मदतनीस महिला कर्मचारी बारावी उत्तीर्ण आहेत, त्यांना ‘मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्यांवर सेविका म्हणून प्राधान्याने नेमणूक दिली जात आहे. तर त्या अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदे नव्याने भरली जात आहेत. त्यात शैक्षणिक पात्रतेवर ७५ गुण असून उर्वरित २५ गुण विधवा, अनाथ, एससी-एसटी, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, दोन वर्षांचा अध्यापनाचा अनुभव या बाबींवर आहेत. यामध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्ग नसल्याने मराठा आरक्षणानंतरही त्या उमेदवारांना भरतीत त्याचा लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

अंगणवाड्यांमधील पदभरती प्रक्रिया अशी…

अर्जदारांमधून सेविका किंवा मदतनीस म्हणून उमेदवारांची भरती तथा निवड करताना १०० गुणांचा निकष लावण्यात आला आहे. त्यात इयत्ता बारावी उत्तीर्ण उमेदवारास गुणांच्या टक्केवारीनुसार ४५ ते ६० गुण दिले जातात. याशिवाय पदवीधर असल्यास एक ते पाच गुण (टक्केवारीनुसार), पदव्युत्तरसाठी चार गुण, डीएडसाठी दोन, बीएडसाठी दोन व ‘एमएस-सीआयटी’साठी दोन गुण अतिरिक्त दिले जातात. याशिवाय विधवा, अनाथ उमेदवारासाठी १० गुण, एससी-एसटी प्रवर्गासाठी दहा गुण, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व विशेष मागास प्रवर्गासाठी पाच गुण आणि दोन वर्षांचा अनुभव असलेल्यांना पाच गुण, अशी गुणदानाची पद्धत आहे. या ‘एसईबीसी’ प्रवर्ग अजून समाविष्ट झालेला नाही.

अंगणवाड्यांमधील भरतीची स्थिती

‘मिनी’च्या मोठ्या झालेल्या अंगणवाड्या
१३,०११
मदतनीस पदभरती
१५,०००
सेविकांची रिक्त पदे
६,०००
भरतीचे एकूण गुण
१००

राज्यातील अंगणवाडी मदतनिसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनिसांची १३ हजार ९०७ पदे रिक्त आहेत. राज्यातील या सर्व १४,६९० पदभर्तीसाठी नवीन जाहिराती लवकरच प्रकाशित होणार आहे.

अंगणवाडी रिक्त जागा साठी भरती 2024 सुरू झाली

शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनिसांची पदे रिक्त आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनिसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले आहे.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीअंतरिम अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांची कविता सादर करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांची पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा 2024-25 या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी विविध घोषणा करतानाच महाराष्ट्रात येत्या काळात पोलीस शिपायांची 17 हजार 471 पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. याचबरोबर नेहमीच्या कार्यक्रम खर्चाकरिता गृह (पोलीस) विभागाला 2 हजार 237 कोटी रुपये नियतव्यय, गृह (उत्पादन शुल्क) विभागास 153 कोटी रुपये आणि विधी व न्याय विभागास 759 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांची 14 हजार पदेही लवकरच भरण्यात येणार असल्याची घोषणा केली.

सुवर्णपदक विजेते खेळाडू होणार कोट्यधीश

दरम्यान अजित पवार यांनी क्रीडा विभागाला कार्यक्रम खर्चासाठी 567 कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित केले आहेत. तसेच राज्यभरातील खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्षवेध’ योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून राज्य स्तरावर उच्च कामगिरी केंद्र, विभागीय पातळीवर क्रीडा उत्कृष्टता केंद्र आणि जिल्हा स्तरावर प्रतिभा विकास केंद्र अशी प्रशिक्षणाची त्रिस्तरीय यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या परितोषिकाच्या रकमेत दहापट वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. त्यानुसार सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना एक कोटी रुपयांचे बक्षीस यापुढे देण्यात येणार आहे. तसेच रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आता 75 लाख रुपये, तर कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

अंगणवाडीतील मदतनीस पदासाठी अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र आणले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी भरतीचे नियम व अटीच्या अधीन राहून त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा, असे पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठविले आहे. राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून ७५ हजार पदांच्या शासकीय मेगाभरतीतील अनेक परीक्षा झालेल्या नाहीत. तलाठ्यांसह अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असून आरक्षणातील बदलामुळे नव्याने होणारी पदभरती थांबली आहे.

त्यामुळे अनेकजण किरकोळ नोकरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे शिफारस पत्र आणत आहेत. दरम्यान, गावातच आपल्या कुटुंबातील महिलेला नोकरी मिळावी म्हणून अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र आणले. ते शिफारस पत्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आले. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी त्या दोन्ही ठिकाणी मदतनीस पद रिक्त नसल्याचे संबंधितांना कळविले. पण, आता मदतनीस पदांची भरती सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शिफारस पत्रानुसार त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा, असे तालुक्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ९०१ मिनी अंगणवाड्यांसह राज्यभरातील १३ हजार सात मिनी अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत. त्यामुळे या सर्वच अंगणवाड्यांमध्ये आता नव्याने मदतनीस पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. गावागावांतील इयत्ता बारावी उत्तीर्ण १३ हजार तरुणींसह महिलांना त्याठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. तालुका स्तरावरील प्रकल्प कार्यालयात अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे

जिल्ह्यातील साधारत: ९०१ मिनी अंगणवाड्या आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी सध्या कार्यरत मदतनीस महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल आणि नव्याने मदतनीस भरती होणार आहे. तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

२५ ते ३० अंगणवाड्यांसाठी एक पर्यवेक्षक नेमला जातो. सोलापूर जिल्हा परिषदेतील बालकल्याण विभागाअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या आहेत. त्यांच्यावरील देखरेखीसाठी सध्या ९२ पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या प्रमाणात १३५ पर्यवेक्षिका जरुरी असून अद्याप ४३ पदे रिक्त आहेत. या पदभरतीसंदर्भातील निर्णय अजूनही प्रलंबित असून काही दिवसांत त्या पदांचीही भरती होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात ९३२ मिनी अंगणवाड्या असून त्यातील ७२९ अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे. तसा प्रस्ताव महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी शासनाला पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्या प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये मदतनीस भरल्या जातील. उर्वरित अंगणवाड्यांमध्ये देखील १०० मदतनीस व २०७ सेविकांची पदे रिक्त आहेत. त्यांची भरती प्रक्रिया काही दिवसांत सुरू होणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची भरती होईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या कार्यरत असून त्याअंतर्गत सव्वालाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यामध्ये तीन हजार १५३ मोठ्या तर ९२३ मिनी अंगणवाड्या आहेत. मोठ्या अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत असते तर त्याठिकाणी एक सेविका व मदतनीस नेमली जाते. मिनी अंगणवाड्यांमध्ये केवळ सेविकाच कार्यरत आहे.

राज्यातील जवळपास १३ हजार तर सोलापूर जिल्ह्यातील ७२९ मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार आहे. त्यामुळे त्याठिकाणी कार्यरत सेविकेला पदोन्नती मिळेल आणि त्याठिकाणी मदतनीस नेमली जाईल. दुसरीकडे त्या अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत देखील असेल.

सध्या सोलापूर जिल्हा परिषदेकडील अंगणवाड्यांमध्ये ३७ पर्यवेक्षिका (सुपरवायझर), २०७ सेविका व ८२९ मदतनीस, अशी पदे रिक्त आहेत. या पदभरतीला काही दिवसांत प्रारंभ होणार असून रे नगर प्रकल्पातील ४० मिनी अंगणवाड्यांमध्येही सेविकांची भरती होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रिक्त पदांची भरती, मिनी अंगणवाड्यांमध्ये श्रेणीवर्धन अशा विविध मागण्या काही दिवसांपूर्वीच्या आंदोलनावेळी करण्यात आल्या होत्या. त्याची टप्प्याटप्याने पूर्तता केली जात आहे.

Educational Qualification For Maharashtra Anganwadi Recruitment 2024

Educational Qualification For Maharashtra Anganwadi Recruitment 2024

Salary Details For Maharashtra Anganwadi Jobs 2024

Salary Details For Maharashtra Anganwadi Jobs 2024

Maharashtra Anganwadi Bharti 2024 Details

Maharashtra Anganwadi Bharti 2024 Details

Maharashtra Anganwadi Recruitment 2024 – Educational

Qualification

Maharashtra Anganwadi Recruitment 2024 – Educational Qualification
Anganwadi Bharti 2024 Age Criteria

अंगणवाडी भरती 2023 करिता उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Maharashtra Anganwadi Application Fees

General. OBC – Rs. 300/-
SC/ ST/ PWD – Rs. 100/-

Salary Details in ICDS

वेतनश्रेणी – रु. 8,000/- ते 15,000/- प्रति महिना

How to Apply For Maharashtra Anganwadi Jobs

  1. The candidate has to visit the official website https://womenchild.maharashtra.gov.in then new screen will open with various links.
  2. Download Maharashtra Anganwadi Recruitment Notification PDF, Read Complete Vacancy Details. 3. If you sure that you have complete eligibility then can participate in the recruitment 4. Click on Apply Online Form. After that new screen will open
  3. Fill your complete details in the application form and upload the scanned documents.
  4. Before submitting the final submit button re-check your filled application form.
  5. The applicant should pay the specified fee through any of the four modes of online payment. Separate instructions have to be followed for each mode of payment.
  6. After the payment of fee, PDF will be generated for Maharashtra Anganwadi Application Form 2023 which contains the details submitted by the candidate. The ID Number in the PDF Application Form is to be quoted for future reference.

https://in.indeed.com/l-pune,-maharashtra-jobs.html?vjk=7f109be0e8ca47bb

https://lokeshtech.com/punjab-and-sind-bank-bharti/

Leave a Comment