Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 पदांची भरती! येथून करा थेट अर्ज
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध पदासाठी रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी 611 रिक्त जागा भरण्यात येत असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येणार आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे. तर पात्र असलेल्या उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत, वेतन, शिक्षण पात्रता, वयाची मर्यादा, ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन मगच अर्ज करावा.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

मित्रांनो पुढे या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Vacancy
- 1 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
- 2 संशोधन सहाय्यक 19
- 3 उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
- 4 आदिवासी विकास निरीक्षक 01
- 5 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205
- 6 लघुटंकलेखक 10
- 7 अधीक्षक (पुरुष) 29
- 8 अधीक्षक (स्त्री) 55
- 9 गृहपाल (पुरुष) 62
- 10 गृहपाल (स्त्री) 29
- 11 ग्रंथपाल 48
- 12 सहाय्यक ग्रंथपाल 01
- 13 प्रयोगशाळा सहाय्यक 30
- 14 कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर 01
- 15 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
- 16 उच्चश्रेणी लघुलेखक 03
- 17 निम्नश्रेणी लघुलेखक 14
- Total 611
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Educational Qualification

- पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
- वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
- संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल.
- संशोधन सहाय्यक
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
- उपलेखापाल-मुख्य लिपिक
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
- आदिवासी विकास निरिक्षक
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
- वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील
- लघुटंकलेखक
- ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र
- गृहपाल (पुरुष)
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
- गृहपाल (स्त्री)
- समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार
- अधिक्षक (पुरुष)
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
- अधिक्षक (स्त्री)
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
- ग्रंथपाल
- ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
- प्रयोगशाळा सहाय्यक
- ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
- उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
- मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
- कॅमेरामन-कम-प्राजेक्टर ऑपरेटर
- ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन मान्य संस्थेमधील फोटाग्राफी, प्रिटींग, एनलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडीओ व्हीज्यूअल मशिन चालविण्याचा प्रत्यक्ष कामाचा ३ वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षक संस्था/शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे
- कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
- सांविधीक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषीत केलेली अन्ये कोणतीही अर्हता असलेले
- सहाय्यक ग्रंथपाल
- ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- तसेच बी.एड. व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार
- प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम)
- उमेदवाराचे इयत्ता १ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे आवश्यक आहे तसेच डी.एड पदवीका इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Teacher Test Eligibility /Central Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
- प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
- मेदवार एसएससी / एचएससी अधिक डी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
- शिक्षण पात्रता परिक्षा (Teacher Eligibility Test /Central Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे
- माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम)
- उमेदवार पदवी अधिक बी.एड व समकक्ष अर्हता धारण करणारा असावा.
- उच्च श्रेणी लघुलेखक
- शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
- निम्न श्रेणी लघुलेखक
- शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 age limit
आदिवासी विकास विभाग भरतीसाठी वयोमर्यादा 29 सप्टेंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
(Minimum) वयोमर्यादा: 18 वर्षे
(Maximum) वयोमर्यादा: 38 वर्षे
अर्ज फी
सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसटी, ट्रान्सजेंडर, पूर्व सैनिक महिलांसाठी 900 रुपये. अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
(GEN/OBC/EWS) : 1000/-
(SC/ST/PWD/ESM) : 900/-
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Apply Online

अधिक माहिती आणि अर्ज ऑनलाइन करण्यासाठी
उमेदवारांनी tribal.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ पाहावे. अर्ज करतानाच आवश्यक कागदपत्रे ही ऑनलाइन सबमिट करायची आहेत.
आदिवासी विकास विभाग भरती २०२३ जाहिरात रद्द केल्याने शुल्क परत मिळवण्यासाठी
खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- सर्व प्रथम, आदिवासी विकास विभाग भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.
- अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
- 🖥️ ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
- 🌐 अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
