अन्न व औषध प्रशासन गतिमान होणार! लवकरच होणार १०,४६८ पदांची! | FDA Maharashtra Jobs 2024

FDA Maharashtra Jobs 2024

FDA Maharashtra Jobs 2024

महाराष्ट्रातील गव्हर्मेंट जॉब शोधण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे
FDA च्या बळकटीकरणासाठी व्यापक योजना प्रस्तावित करण्यात आली असून या अंतर्गत तब्बल १०,४६८ पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात अन्न सुरक्षा कायदा असो की औषध विक्री दुकाने, औषध कंपन्या आदींच्या नियमित तपासणीसाठी आजमितीला अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे अन्न व औषध निरीक्षक नाहीत तसेच कर्मचारी, अत्याधुनिक प्रयोगशाळा व तंत्रज्ञ यांची कमतरता असल्यामुळे तपासणी व कारवाईच्या आघाडीवर बोंब आहे. या पाश्र्वभूमीवर ‘FDA’ च्या बळकटीकरणासाठी व्यापक योजना प्रस्तावित करण्यात आली असून या अंतर्गत तब्बल १०,४६८ पदे भरण्यात येणार आहेत.

यात सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, औषध व अन्न निरीक्षकांबरोबर तालुका स्तरावर कार्यालयांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. ग्राहकांना उत्तम दर्जाची औषधे, सौंदर्य प्रसाधने तसेच सुरक्षित अन्नपदार्थ मिळण्यासाठी व त्या अनुषंगाने असलेल्या अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे.
१) एकूण पदे किती २) फॉर्म कसा भरावा ३) कोणत्या जिल्ह्यासाठी भरावा ४) शैक्षणिक मर्यादा. याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे तरी आपण काळजीपूर्वक वाचावी

अन्न व औषध प्रशासन गतिमान होणार! लवकरच होणार १०,४६८ पदांची! | FDA Maharashtra Jobs 2024
नमस्कार

अन्न व औषध प्रशासन गतिमान होणार! लवकरच होणार १०,४६८ पदांची

FDA Maharashtra Jobs 2024

औषधे १७५ पदे तर औषधे २५० पदे, ६७० औषध निरीक्षक व ९०० अन्न सुरक्षा अधिकारी, १११ लिपिक, २९७ वरिष्ठ लिपिक, तांत्रिक सहाय्यक औषधे व अन्न साठी ६१८० पदे, लिपिक टंकलेखकांची ६८९ पदे, २२६ शिपाई आदी १०,४६८ पद निर्मितीचा प्रस्ताव सादर केला आहे. तालुकानिहाय अन्न व औषध निरीक्षकांची पदे मंजूर झाल्यास अत्यंत सक्षमपणे अन्न व औषध प्रशासन काम करू शकेल असा विश्वास आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण विभागाची जबाबदारी केवळ १६ निरीक्षकांवर
ठाणे जिल्ह्यासाठी २२ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात ६ औषध निरीक्षक कर्तव्यावर असून ठाणे विभागात एकूण ४२ पदे मंजूर असताना संपूर्ण विभागाची जबाबदारी फक्त १६ औषध निरीक्षकांवर आहे. औषध निरीक्षक पदे भरती होत नसल्याने कर्तव्यावर असलेल्या औषध निरीक्षकांवर कामाचा ताण वाढला असून औषधे विक्री करणाऱ्यांनादेखील विविध अडचणी येत आहेत. याबाबत ठाणे जिल्ह्याचे औषध संयुक्त आयुक्त दुष्यंत भामरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

१. भेसळयुक्त दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पडताळण्यासाठी पाठवल्यास अहवाल येण्यासाठी १ वर्ष लागत असल्याची तक्रार अतुल भातखळकर यांनी सभागृहात दिली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रवींद्र वायकर यांनी भेसळयुक्त दुधाप्रकरणी वर्षभरात किती धाडी टाकण्यात आल्या आणि किती गुन्हे नोंदवण्यात आले ? याची माहिती सादर करण्याची मागणी केली.

२. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दूध भेसळीसाठी आजीवन कारावासाची शिक्षा करण्याची मागणी केली. भाजपचे आमदार राम कदम यांनी दूध भेसळ करणार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

यावर उत्तर देतांना मंत्री संजय राठोड म्हणाले, वर्ष २०२२-२३ मध्ये भेसळयुक्त दुधाचे १ सहस्र १८७ नमुने पडताळण्यात आले. त्यांतील ३५० नमुन्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. मुंबईत दुधाचे १०२ नमुने पडताळण्यात आले असून त्यांतील अहवाल आलेले नाहीत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करेल. राज्यात दुधाळ जनावरे किती आहेत आणि प्रत्यक्ष किती दुधाची विक्री होते ? याची पडताळणी करण्यात येईल. फिरत्या प्रयोगशाळा चालू करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे.’

अन्न व औषध प्रशासनातील 50 टक्के पदे रिक्त

अन्न व औषध प्रशासनातील 50 टक्के पदे रिक्त

https://lokeshtech.com/ordnance-factory-dehu-road-bharti-2024/

Leave a Comment