ICDS Bharti 2024 | एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती. अर्ज प्रक्रिया सुरू..
महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत “मुख्यसेविका गट-क” संवर्गातील सरळसेवा कोटयातील एकुण १०२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरायचा आहे. या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 नोव्हेंबर 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची तारीख हि तालुक्यानुसार वेगवेगळी राहील.
ICDS Bharti 2024

ICDS Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्पांतर्गत सरळसेवेच्या कोट्यातील मुख्यसेविका गट-क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील एकुण 102 रिक्त पदांच्या भरती करीता फक्त पात्र महिला उमेदवाराकडून ऑनलाईन मागविण्यात येत आहेत. तरी पात्र आणि इच्छुक महिला उमेदवारांनी दिनांक 14/10/2024 पासुन ते 03/11/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करावेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
ICDS Bharti 2024 Vacancy
मुख्यसेविका 102
मुख्यसेविका गट-क ” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास हा महाराष्ट्रातील नामांकित सरकारी विभाग असून या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना या अंतर्गत चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया ,अर्जाची लिंक, महत्त्वाची कागदपत्र आणि इतर सविस्तर माहिती खाली दिलेली वाचा.
पदाचे नाव : मुख्यसेविका या पदांची निवड करण्यात येणार आहे.
ICDS Bharti 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार . अधिक सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिसुचनेत सांगितल्याप्रमाणे अर्ज करणारा उमेदवार हा संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस: उमेदवार मान्यताप्राप्त मंडळ/शाळेतून 8वी उत्तीर्ण असावा.
अंगणवाडी पर्यवेक्षक आणि सेविका : उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळ/शाळेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.
प्रकल्प अधिकारी: उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.
ICDS Bharti 2024 Salary
Rs. 35,400 to Rs.1,12,400 /- pm
ICDS Bharti 2024 Fees
ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.1,000/- रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना रु.900/- शुल्क भरावे लागेल.
ICDS Bharti 2024 Age Limit
महिला व बालविकास विभागामध्ये विविध पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 03/11/2024 रोजी 21 ते 38 वर्षे असावे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षे सूट देण्यात आली आहे.
किमान वय: 21 वर्षे
कमाल वय: 40 वर्षे
अंगणवाडी मदतनीस वयोमर्यादा : ५० वर्षे
Important Dates : ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक 14/10/2024 असून शेवट दिनांक 03/11/2024 पर्यंत अर्ज करता येईल. ऑनलाईन परिक्षेचा दिनांक अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येईल.
How To Apply For Mahila Bal Vikas Vibhag Job 2024

- इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.
- त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- PDF जाहिरात
- https://shorturl.at/adCM8
- PDF जाहिरात
- ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/WHpn5
- अधिकृत वेबसाईट
- https://womenchild.maharashtra.gov.in/
- महाराष्ट्र अंगणवाडी रिक्त पद २०२४ साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या : womenchild.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
- भर्ती विभाग शोधा : मुख्यपृष्ठावर भरती किंवा करिअर विभाग शोधा, जिथे नवीनतम नोकरीच्या सूचना पोस्ट केल्या जातात.
- अंगणवाडी अधिसूचना तपासा : महाराष्ट्र अंगणवाडी अधिसूचना शोधा आणि पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा समजून घेण्यासाठी ती पूर्णपणे वाचा.
- आवश्यक कागदपत्रे तयार करा : अर्ज प्रक्रियेदरम्यान अपलोड करण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे तयार असल्याची खात्री करा. (खालील दस्तऐवज आवश्यकता पहा.)
- अर्ज भरा : ऑनलाइन फॉर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी अर्ज लिंकवर क्लिक करा.
- दस्तऐवज अपलोड करा : आवश्यक कागदपत्रे निर्दिष्ट नमुन्यात संलग्न करा.
- अर्ज फी भरा : लागू असल्यास, प्रदान केलेल्या ऑनलाइन पेमेंट पर्यायांद्वारे आवश्यक अर्ज फी भरा.
- पुनरावलोकन करा आणि सबमिट करा : सबमिट करण्यापूर्वी, अचूकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रविष्ट केलेल्या माहितीचे आणि अपलोड केलेल्या दस्तऐवजांचे पुनरावलोकन करा.
- मुद्रित पुष्टीकरण : सबमिशन केल्यानंतर, पुष्टीकरण पृष्ठ मुद्रित करा किंवा भविष्यातील संदर्भासाठी जतन करा.
- अद्ययावत रहा : निवड प्रक्रिया, मुलाखतीच्या तारखा आणि इतर महत्त्वाच्या घोषणांशी संबंधित अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.
महाराष्ट्र अंगणवाडी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक प्रमाणपत्रे:
ओळखीचा पुरावा: ओळख पडताळणीसाठी आधार कार्ड, मतदार आयडी किंवा सरकारने जारी केलेला कोणताही आयडी.
पत्ता पुरावा
अनुभवाचे प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
जातीचा दाखला
इतर संबंधित प्रमाणपत्रे
Selection process : जाहिरातीत दिलेल्या माहीतीनुसार कोणत्याही विविध पदावर अर्ज करणा-या उमेदवारांची संगणक आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार असून परीक्षेमध्ये इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण अभियान, गणित, बुध्दिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान एकुण 200 गुणांची बहुपर्यायी परिक्षा घेण्यात येईल. परिक्षेतील गुणांच्या मेरीटनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
महाराष्ट्र अंगणवाडी बद्दल
महाराष्ट्र अंगणवाडी ही बालके आणि महिलांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षण वाढविण्याच्या राज्याच्या प्रयत्नांचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास विभागांतर्गत कार्यरत, अंगणवाडी केंद्रे समुदाय-आधारित बाल संगोपन सुविधा म्हणून काम करतात, पोषण सहाय्य, आरोग्य शिक्षण आणि प्रीस्कूल शिक्षण यासारख्या आवश्यक सेवा प्रदान करतात. ही केंद्रे कुपोषणाचा सामना करण्यासाठी आणि ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांचे एकंदर कल्याण सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात