Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेत १० वी, १२ वी ते पदवीधरांना नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया होणार सुरु. कोकण रेल्वेत नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे, कारण भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे विभागात अनेक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानुसार, वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक पदासह काही इतर पदांच्या १९० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२४ आहे.पण अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी विषयी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटवरुन जाणून घ्या.
Konkan Railway Recruitment 2024
रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून नेमकी कोणती आणि किती पदे भरली जाणार आहेत, अर्ज कुणी करावा, त्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती आणि अर्जाची अंतिम तारीख काय आहे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या बातमीमध्ये मिळेल.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड १९० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील पात्र उमेदवार यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत konkanrailway.com वर अर्ज करू शकतात.
KRCL Vacancy 2024
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) / Senior Section Engineer (Civil) | 05 |
2 | सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical) / Senior Section Engineer (Electrical) | 05 |
3 | स्टेशन मास्टर / Station Master | 10 |
4 | कमर्शियल सुपरवाइजर / Commercial Supervisor | 05 |
5 | गुड्स ट्रेन मॅनेजर / Goods Train Manager | 05 |
6 | टेक्निशियन III (Mechanical) / Technician III (Mechanical) | 20 |
7 | टेक्निशियन III (Electrical) / Technician III (Electrical) | 15 |
8 | ESTM-III (S&T) / ESTM-III (S&T) | 15 |
9 | असिस्टंट लोको पायलट / Assistant Loco Pilot | 15 |
10 | पॉइंट्स मन / Points Man | 60 |
11 | ट्रॅक मेंटेनर-IV / Track Maintainer-IV | 35 |
Educational Qualification for Konkan Railway Recruitment 2024
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil) | इंजिनिअरिंग पदवी (Civil) |
सिनियर सेक्शन इंजिनिअर(Electrical) | इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics) |
स्टेशन मास्टर | कोणत्याही शाखेतील पदवी |
कमर्शियल सुपरवाइजर | कोणत्याही शाखेतील पदवी |
गुड्स ट्रेन मॅनेजर | कोणत्याही शाखेतील पदवी |
टेक्निशियन III (Mechanical) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter) |
टेक्निशियन III (Electrical) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman/Mechanic) |
ESTM-III (S&T) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician / Electronics Mechanic / Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths) |
असिस्टंट लोको पायलट | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile) |
पॉइंट्स मन | 10वी उत्तीर्ण |
ट्रॅक मेंटेनर-IV | 10वी उत्तीर्ण |
Eligibility Criteria For Konkan Railway Bharti 2024
सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क : 885/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : 56,100/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोकण रेल्वे
पगार किती मिळेल?
१. सीनियर सेक्शन इंडजीनियर ४४,९०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 7)
२. स्टेशन मास्टर : ३५,४०० रुप्ये प्रति महिना (पे लेव्हल
३. व्यावसायिक पर्यवेक्षकासाठी: ३५,४०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 6)
४. गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी: २९,२०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 5)
५. टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल): १९,९०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 2)
६. असिस्टंट लोको पायलटसाठी: ९,९०० रुपये प्रति महिना (पे लेव्हल 2)
७. पॉइंट्स मॅन आणि ट्रॅक मेंटेनरसाठी: १८,००० रुपये प्रति महिना (पे लेव्हल (1)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
जमीन गमावणारे उमेदवार: ज्यांची जमीन KRCL प्रकल्पासाठी मागितली गेली आहे ते या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. याव्यतिरिक्त, त्यांचे जोडीदार (पती/पत्नी), मुले आणि नातवंडे देखील अर्ज करू शकतात. या गटाला निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.
एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नोंदणी असलेले उमेदवार: महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटकमध्ये राहणाऱ्या व्यक्ती, ज्यांच्याकडे कोकण रेल्वे मार्गावर नोंदणीकृत वैध रोजगार विनिमय कार्डे आहेत, त्यांना भरती प्रक्रियेत दुय्यम प्राधान्य दिले जाईल.
सामान्य उमेदवार: महाराष्ट्र, गोवा किंवा कर्नाटकातील रहिवासी, जे जमीन गमावणाऱ्या श्रेणीत किंवा रोजगार विनिमय नोंदणी श्रेणीमध्ये येत नाहीत, त्यांना या भूमिकांसाठी तिसऱ्या क्रमांकावर मानले जाईल.
KRCL कर्मचारी: KRCL चे सध्याचे कर्मचारी ज्यांनी किमान तीन वर्षे नियमितपणे सेवा केली आहे ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत.
वरील निकषांची पूर्तता करणाऱ्यांसाठी, 1 ऑगस्ट 2024 पर्यंत 18 ते 36 वयोगटातील व्यक्तींसाठी अर्जाचा कालावधी खुला आहे. कोविड-19 साथीच्या आजारामुळे प्रभावित उमेदवारांना सामावून घेण्यासाठी वयोमर्यादा 33 वरून 36 वर्षे करण्यात आली आहे.
Official Site : www.konkanrailway.com
How to Apply For Konkan Railway Recruitment 2024 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1893/90834/Index.html या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 ऑक्टोबर 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.konkanrailway.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा