MPSC Krushi Seva Recruitment 2024: महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये नवीन 258 भरती जाहीर! नोकरीची मोठी संधी

MPSC Krushi Seva Recruitment 2024: महाराष्ट्र कृषी सेवा मध्ये नवीन 258 भरती जाहीर! नोकरीची मोठी संधी

मित्रांनो सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये कृषि खात्यांतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी MPSC Krushi Seva Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीद्वारे 258 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 ही आहे.
जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

MPSC Krushi Seva Recruitment 2024

MPSC Exam 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) कृषी क्षेत्रातील विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. यामध्ये उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/तांत्रिक अधिकारी, कृषी अधिकारी, कनिष्ठ आणि इतर पदांचा समावेश आहे. एकूण 258 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे, ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

MPSC Krushi Seva Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
उप संचालक कृषि48
तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी53
कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर157
Important Date

MPSC Krushi Seva Recruitment 2024 – Important Date

Important Date

MPSC Krushi Seva Notification 2024

MPSC Krushi Seva Notification 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

Age Limit
वयोमार्यादा : या पदांसाठी ज्या उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामध्ये सूट :

SC/ ST: 05 वर्षे सूट.
OBC: 03 वर्षे सूट.

MPSC Krushi Seva Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 21,000/- ते 41,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

How To Apply For MPSC Krushi Seva Application 2024

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज 27 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

  • एमपीएससी कृषि सेवा भरती 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  • अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
How To Apply For MPSC Krushi Seva Application 2024

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Important Links For mpsc.gov.in Job 2024

PDF जाहिरात
https://shorturl.at/tk4dI

ऑनलाईन अर्ज करा (27 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील)
https://mpsc.gov.in/

https://lokeshtech.com/sangli-miraj-kupwad-mahanagarpalika-bharti-2024/

Leave a Comment