NABARD Recruitment 2024| राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये 10वी पासवर 108 जागांसाठी मेगा भरती;येथे करा अर्ज

NABARD Recruitment 2024| राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये 10वी पासवर 108 जागांसाठी मेगा भरती;येथे करा अर्ज. १० वी पास उमेदवारांसाठी नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड)मध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. नाबार्डने ग्रुप-सी ऑफिस अटेंडंट या रिक्त पदांवरील भरतीबाबत एक अधिसूचना जारी केली आहे, ज्याद्वारे नाबार्डमध्ये १०८ ऑफिस अटेंडंट पदे भरली जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.nabard.org वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होऊन २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. (Nabard Office Attendant Racruitment 2024)

NABARD Recruitment 2024

NABARD Recruitment 2024

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड अंतर्गत दहावी पास वर गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण 108 रिक्त जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे.
या भरतीसाठी कमीत कमी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, उमेदवाराने खालील लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

NABARD Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
ऑफिस अटेंडंट108
शैक्षणिक पात्रता

Nabard Recruitment 2024 Education Qualification

नाबार्ड ऑफिस अटेंडंटच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असावा. शैक्षणिक पात्रतेसंदर्भात तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.

माजी सैनिक श्रेणीतील उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा (एसएससी/मॅट्रिक्युलेशन) आणि किमान 15 वर्षे संरक्षण सेवा प्रदान केलेली असावी, जर त्यांनी सशस्त्र दलाबाहेर पदवी प्राप्त केली नसेल.

वयोमर्यादा : जाहिरात प्रकाशित झालेल्या तारखेस उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे पर्यंत असण गरजेच आहे, शासनाच्या नियमानुसार वयामध्ये शिथिलता ठेवण्यात आले असून सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पाहू शकता.
अर्ज करण्याची पद्धत : या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असून उमेदवाराने खालील लिंक वरून विहित तारखे मध्ये अर्ज सादर करणे बंधनकारक राहील.
अर्ज सादर करण्याचा कालावधी : ऑनलाईन अर्ज 02 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 दरम्यान मागवले जाणार आहेत या दरम्यानच उमेदवाराने अर्ज सादर करावे त्यानंतर किंवा त्याच्या अगोदर कोणत्याहि प्रकारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
पगार : निवड झालेल्या उमेदवाराला मासिक पगार 35 हजार रुपये एवढा देण्यात येईल या व्यतिरिक्त इतर भत्ते सुद्धा लागू राहतील.

पात्रता निकष
NABARD Office Attendant Vacancy 2024 साठी ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांना NABARD Office Attendant Notification 2024 द्वारे पात्रता निकष तपासावे लागतील. या पदांसाठी उमेदवारांची पात्रता शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेनुसार निश्चित केली जाईल.

उमेदवारासाठी सूचना

  • उमेदवाराने अर्ज सादर करण्या अगोदर जाहिरात डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या वाचावी आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.
  • उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचा असून ऑनलाईन अर्ज 2 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहेत. अर्ज सुरू झालेल्या तारखेस कळविण्यात येईल.
  • उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केले तर स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
  • उमेदवार संपूर्ण अर्हता धारण करत असेल तर व्यवस्थित रित्या जाहिरात वाचून पात्रता तपासून अर्ज सादर करावा.
  • पात्रता धारण करत नसलेल्या अथवा अपूर्ण आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याची नोंद घ्यावी.

नाबार्ड कार्यालय परिचर अधिसूचना 2024 PDF

नाबार्ड कार्यालय परिचर भर्ती 2024 ची छोटी अधिसूचना नाबार्डने 27 सप्टेंबर 2024 रोजी रोजगार वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. तपशीलवार अधिसूचना PDF अधिकृत वेबसाइट https://www.nabard.org/ वर 02 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्रसिद्ध केली जाईल. तोपर्यंत खाली दिलेल्या शॉर्ट नोटिसच्या स्निपेटवर एक नजर टाका.

शॉर्ट नोटिसच्या स्निपेट

Nabard Recruitment 2024 Form Fees

अर्ज भरण्याबरोबर उमेदवारांना अर्ज शुल्कही जमा करावे लागेल. सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना ४५० रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि PH श्रेणीतील उमेदवारांना फक्त ५० रुपये भरावे लागतील.

How To Apply nabard recruitment 2024

nabard recruitment 2024
  • आता होमपेजवर NABARD Office Attendant Recruitment 2024 ही लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आता तुमचे नाव, मोबाइल नंबरसह विचारलेली माहिती भरा.
  • आता तुमच्या मोबाइल नंबरवर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पाठवला जाईल.
  • मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि पूर्ण अर्ज व्यवस्थित भरा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • आता अर्ज शुल्क भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • अशाप्रकारे अर्ज सबमिट होईल. तुम्ही या अर्जाची प्रत डाऊनलोड करून ठेवू शकता.
Important Links For nabard.org Notification 2024

PDF जाहिरात – https://shorturl.at/sRCgf

ऑनलाईन अर्ज करा 02 ऑक्टोबर पासून https://shorturl.at/kzo6u

Leave a Comment